Advertisement

रणवीर सिंगचे न्यूड फोटो होत आहेत व्हायरल, दीपिका...


रणवीर सिंगचे न्यूड फोटो होत आहेत व्हायरल, दीपिका...
SHARES

अभिनेता रणवीर सिंह फोटोशूटसाठी चक्क न्यूड (Nude Photoshoot) झालाय. रणवीर सिंहच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिली आहे.

पेपर मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. प्रत्येक फोटोंमध्ये रणवीर सिंहचा लूक कॉन्फिडेंट, बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. रणवीर सिंहच्या फोटोशूटचं काहींनी कौतुक केलेय तर काहींनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलेय. 

'Ranveer Singh: the Last Bollywood Superstar ' या मथळ्याखाली पेपर मॅगझीनने रणवीर सिंह बद्दल माहिती आणि फोटो पोस्ट केले आहेत.  

रणवीर नुकताच नेटफ्लिक्सच्या इंटरएक्टिव्ह स्पेशल रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्समध्ये दिसला. याशिवाय, त्याने अलीकडेच शाहरुख खानच्या मन्नतजवळ 119 कोटी रुपयांची नवीन मालमत्ता विकत घेतल्याचे वृत्त आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी वाढदिवस अज्ञात ठिकाणी साजरा केला. रणवीर रोहित शेट्टीच्या पुढील दिग्दर्शनातील सर्कसमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय रणवीरकडे आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चनसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी देखील आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा