‘जयेशभाई जोरदार’मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लुक पाहिलात का?

आता तो आणखी एका वेगळ्या आमि हटके भूमिेत दिसणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

SHARE

बॉलीवूड अभिनेत्यांमध्ये सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे रणवीर सिंह. रणवीर सिंह त्याच्या वेगळ्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. भमिकांमध्ये वेगळेपणा देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. आता तो आणखी एका वेगळ्या आमि हटके भूमिेत दिसणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

जयेशभाई जोरदार’ या सिनेमातील रणवीरचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात तो एका गुजराती तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा हटके लुक सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! 🤓💗💪🏾 #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on 

रणवीरनं या नव्या लुकमध्ये पोलका डॉट्स असणारं ऑरेंज कलरचं टिशर्ट घातलं आहे. त्याला सूट होईल अशी फेडेड पॅन्ट घातली आहे

"जयेशभाई असा व्यक्ती आहे जो अडचणीच्या परिस्थितीत काहीतरी विलक्षण कामगिरी करून जातो. त्याचसोबत तो संवेदनशील आणि दयाळू आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही पुरुष आणि महिलांना समान अधिकार मिळावेत यावर विश्वास ठेवणारा आहे," असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं.हेही वाचा

कर्जमाफिचा आरोप करणाऱ्यानं मागितली रीतेशची माफी

'पानिपत'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटलांना दिलासा नाहीच


संबंधित विषय
ताज्या बातम्या