Advertisement

कर्जमाफीचा आरोप करणाऱ्यानं मागितली रितेशची माफी

रितेश देशमुखनं ट्विट केल्यानंतर मधू यांनी ट्विट डिलीट तर केलंच शिवाय त्यांनी रितेशची माफी देखील मागितली आहे.

कर्जमाफीचा आरोप करणाऱ्यानं मागितली रितेशची माफी
SHARES

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा भाऊ अमित देशमुखला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही कागदपत्र सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी देखील ट्विटरवर शेअर केली होती. मात्र त्यांच्या ट्विटवर रितेशनं उत्तर देत कर्ज घेतलं नसल्याचा खुलासा केला.

रितेश देशमुखनं ट्विट केल्यानंतर त्यांनी त्यांचं ट्विट डिलीट तर केलंच शिवाय त्यांनी रितेशची माफी देखील मागितली आहे. माझ्या मुंबईमधील एका मित्रानं मला ही माहिती दिली. मी जाणूबुजून कधीच कोणाबाबत चुकीची माहिती शेअर करत नाही. मला माफ करा या प्रकरणात माझी दिशाभूल झाली. यापुढे मी माझ्या जवळच्या मित्रांवरही विश्वास ठेवणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करते. पण ज्याप्रकारे तुम्ही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी तुमचे कौतुक करते. रितेश तुझे खूप खूप आभार तुझ्या एका ट्विटने मला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. रितेशनं देखील त्यांना 'धन्यवाद' असं ट्विट करून म्हटलं आहे.

मधू किश्वर यांनी मंगळवारी रितेशनं कर्ज घेतल्याची काही कागदपत्रे शेअर केली होती. कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करताच रितेशनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.सोशल मीडियावर ही कागदपत्रं चुकीच्या उद्देशानं पसरवली जात आहेत. मी आणि अमितनं कोणतेच कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका’ असं ट्विट केलं होतं. रितेशच्या ट्विटनंतर मधू किश्वर यांनी आरोप मागे घेत रितेशची माफी मागितली.हेही वाचा

महिला क्रिकेटर मिताली राजवर बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार मितालीची भूमिका

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीतीची जोरदार ट्रेनिंग


संबंधित विषय
Advertisement