Advertisement

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीतीची जोरदार ट्रेनिंग

सायना नेहवालवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये आधी श्रद्धा कपूर काम करणार होती. पण डेट्सच्या कमतरतेमुळे तिनं हा चित्रपट सोडून दिला.

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीतीची जोरदार ट्रेनिंग
SHARES

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी तयारी करत असलेल्या परिणितीनं इंस्टाग्राम स्टोरीवर मॅचच्या डे वनची झलक शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीला बॅडमिंटन सरावा दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तिनं काही काळासाठी सरावाला ब्रेक दिला होता. पण आता तिची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून तिनं बँडमिंटनच्या सरावाला सुरुवात केली.

परिणीतीची जोरदार ट्रेनिंग

परिणीती, सायनासारखे बॅडमिंटन खेळण्यासाठी मागील ४ महिन्यांपासून सलग ट्रेनिंग घेत आहे. ती बायोपिकसाठी पूर्णपणे तयार होण्यासाठी १५ दिवस पनवेलच्या रामसेठ ठाकुर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये राहिली. जेणेकरून शूटिंग आणि बॅडमिंटनची प्रॅक्टिस एकाचवेळी करू शकेल

View this post on Instagram

Real & Reel Saina Nehwal 🏸@parineetichopra @nehwalsaina

A post shared by Parineeti Chopra FC (@parineetichopra_fanclub) on

परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी मानेला झालेल्या दुखापतीमुळे ग्रस्त होती. ज्यामुळे ती बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहिली. मात्र सोमवारपासून तिनं पुन्हा शटल कॉक आणि रॅकेट हातात घेतलं आहे.


फॅन्सकडून कौतुक...

परिणीतीचे फोटो पाहून तिचे आणि सायना नेहवालचे फॅन्स खूप खुश आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे. लोक सायना आणि परिणीतीचा लूक आणि बॉडी लँग्वेजची तुलना करत आहेत.श्रद्धाच्या जागी परिणीती

सायना नेहवालवर बनत असलेल्या बायोपिकमध्ये आधी श्रद्धा कपूर काम करणार होती. पण डेट्सच्या कमतरतेमुळे तिनं हा चित्रपट सोडून दिला. आता हा चित्रपट परिणीतीच्या वाट्याला आला आहे. हेही वाचा

अमिताभ यांचे -३ डिग्रीमध्ये शूटिंग

तेलगु चित्रपट 'भागमती'चा लवकरच हिंदीत रिमेक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा