तेलगु चित्रपट 'भागमती'चा लवकरच हिंदीत रिमेक

'दुर्गावती' तेलगुचा हॉरर थ्रिलर चित्रपट 'भागमती'चा हिंदी रिमेक आहे. अनुष्काची भूमिका साकारणार ही अभिनेत्री...

SHARE

अक्षय कुमारनं प्रेझेंटर म्हणून आपला नवा चित्रपट 'दुर्गावती'ची घोषणा केली आहे. अक्षयनं ट्विटरवर एक फोटो शेअर करून सांगितलं की, 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडणेकर लीड रोल साकारणार आहे. फोटोमध्ये चित्रपटाशी निगडित ५ भूमिका दिसत आहेत आणि सर्वांनी हातात एक-एक पाटी धरलेली आहे. अक्षय कुमारसोबतच टी-सीरीजचा मालक भूषण कुमारदेखील या चित्रपटाचा प्रेझेंटर आहे. तर अशोक याचा दिग्दर्शक आणि विक्रम मल्होत्रा प्रोड्यूसर आहे. भूमी पेडणेकरनं हिरोची पाटी धरलेली आहे.


'भागमती'चा रिमेक...

'दुर्गावती' तेलगुचा हॉरर थ्रिलर चित्रपट 'भागमती'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, उन्नी मुकुंदन, जयराम, ऊषा सरत आणि विद्युलेखा रमन यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ ला रिलीज झाला होता.


भूमी खूप उत्साही

भूमीनेदेखील ट्विटरवर 'दुर्गावती'ची घोषणा केली आहे. तिने लिहिले आहे, "खूप दिवसांपासून मी हे तुमच्यासोबत शेअर करण्याची वाट पाहात होते. आपला नवा चित्रपट 'दुर्गावती' ची घोषणा करताना खूप उत्साहित आहे. हा एक स्केअरी थ्रिलर चित्रपट असेल. जो जानेवारीमध्ये फ्लोअरवर येईल. धन्यवाद अक्षय कुमार सर माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. मी यासाठी खूप उत्साहित आहे."हेही वाचा

अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात अटक वॉरंट जारी

प्रियंका-निकच्या आयुष्यात आला एक छोटा नवा पाहुणा


संबंधित विषय
ताज्या बातम्या