अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात अटक वॉरंट जारी

इंदूरमधल्या एका तरूणीनं अमीषा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर अमीषाच्या विरोधात इंदूरमधील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

SHARE

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणीत आणखा वाढ होण्याची शक्यता आहे. अमीषाच्या विरोधात इंदूरमधील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. १० लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी इंदूरमधल्या एका तरूणीनं अमीषा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अमीषावर याआधी देखील चेक बाऊंसप्रकरणी तिची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.


पोलिसात तक्रार दाखल

इंदूरमधल्या एका तरूणीकडून सिनेप्रोडक्शनच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपये घेतले होते. यानंतर अमिषानं तिला परत १० लाख रुपयाचा चेक दिला जो बाउन्स झाला. चेक बाउन्स झाल्यावर तरुणीनं अनेकदा अमिषाकडे पैसे मागितले. पण अमिषानं पैसे दिले नाही. अखेर तरुणीनं तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


१० लाखचा चेक बाऊंस

इंदूरमधील जिल्हा कोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी प्रकरणी वकील नितेश परमार म्हणाले की, निशा छीपा ही अमिषा पटेलला ओळखायची. फिल्म प्रोडक्शनसंबंधीत अमिषानं निशाकडून १० लाख रुपये घेतले होते आणि त्याबदल्यात २० एप्रिल २०१९ चा चेकही दिला होता. दिलेल्या तारखेनंतर निशानं हा चेक बँकेत जमा केला असता तो बाउन्स झाला.


अमिषाविरोधात अटक वॉरंट

प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी मनीष भट्ट यांनी तक्रारीवर सुनवाई देत २७ जानेवारीला अमिषा पटेलला न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. अमिषानं दिलेला चेक बाउन्स होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्याविरोधात रांची कोर्टात तीन कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी खटला सुरू असून अमिषाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.हेही वाचा

सलमान खानचा 'दबंग ३' वादाच्या भोवऱ्यात

कुणाल खेमू स्टारर 'लूटकेस'च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर


संबंधित विषय
ताज्या बातम्या