Advertisement

प्रियंका-निकच्या आयुष्यात आला एक छोटा नवा पाहुणा

प्रियंकाच्या घरातील या नव्या पाहूण्याला भेटा. प्रियांकानं सकाळीच निकला हे सरप्राईज दिलं आहे.

प्रियंका-निकच्या आयुष्यात आला एक छोटा नवा पाहुणा
SHARES

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. रोज काही ना काही फोटो ते शेअर करत असतातच. या फोटोजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती चर्चेच असण्याचं कारण म्हणजे तिनं निकला दिलेली अनोखी भेटवस्तू


अरे हो, हो. सांगते सांगते. मला माहित आहे तुम्हाला देखील उत्सुक्ता असेल प्रियंकानं निकला असं काय गिफ्ट दिलं. तर प्रियंकानं निकला एक कुत्रा भेट दिला आहे. प्रियंकानं निकला झोपेतून उठवून हे सरप्राईज गिफ्ट दिलं. याचा व्हिडिओ देखील तिनं इन्स्टावर शेअर केला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे भेट तिनं दिली आहे



निकनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करुन घरातील या नव्या पाहुण्याबाबत माहिती दिली. या कुत्र्याचं नाव त्यांनी ‘गिनो जोनास’ असं ठेवलं आहे. “आमच्या घरातील या नव्या पाहूण्याला भेटा. प्रियांकानं सकाळीच मला हा कुत्रा भेटस्वरुपात दिला. ही भेट पाहून मला खुप आनंद झाला आहे”, असं निकनं म्हटलं आहे.



हेही वाचा

द पावर ऑफ 'कमांडो ३'

शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या 'कहानी'त अभिषेकची एन्ट्री


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा