द पावर ऑफ 'कमांडो ३'

५ मिनिटांच्या व्हिडिओत शालेय मुलींची छेड काढणाऱ्या पहेलवानांना विद्युत धडा शिकवताना दिसतोय. विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

SHARE

अभिनेता विद्युत जामवालनं इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आगामी 'कमांडो-'चित्रपटातील त्याच्या एन्ट्री सिक्वेन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ५ मिनिटांच्या व्हिडिओत विद्युत पहेलवांनासोबत मारधाड करताना दिसतोय. या व्हिडिओत त्याची टोन्ड बॉडी तर दिसतेच. यासोबतच अॅक्शनचा जबरदस्त तडका देखील पाहायला मिळतोय

५ मिनिटांच्या व्हिडिओत शालेय मुलींची छेड काढणाऱ्या पहेलवानांना विद्युत धडा शिकवताना दिसतोय. विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ये तो सिर्फ शुरुवात है, २९ नोव्हेंबर को होता है क्या? असं लिहत त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. 

'कमांडो-' हा त्याच्या 'कमांडो' चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अदा शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात गुलशन देवैया व्हिलनच्या रुपात झळकतोय. आदित्य दत्त यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.हेही वाचा

कुणाल खेमू स्टारर 'लूटकेस'च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर

मराठमोळ्या स्पृहाचे वेबसिरीजच्या विश्वात पहिलं पाऊल


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ