Advertisement

अमिताभ यांचे -३ डिग्रीमध्ये शूटिंग

सध्या मनालीचं तापमान मायनस ३ डिग्री आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर आणि ब्लॉगवर सेटवरचे काही फोटो शेअर करुन मनालीच्या थंडीविषयी सांगितलं.

अमिताभ यांचे -३ डिग्रीमध्ये शूटिंग
SHARES

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या मनालीत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अमिताभ मनालीत अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासह रणबीर कपूर आणि आलिया भट महत्त्वाच्या भूमिकांत आहेत

सध्या मनालीचं तापमान मायनस ३ डिग्री आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर आणि ब्लॉगवर सेटवरचे काही फोटो शेअर करुन मनालीच्या थंडीविषयी सांगितलं. त्यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे की, "माइनस डिग्री, म्हणजे -3... आणि काम करण्याची पद्धत"


बिग बींनी चेक्सचा शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि सनग्लासेस लावले आहेत. त्यांनी ब्लाॅगमध्ये लिहिलं आहे की, वर्क शेड्युलसाठी आम्ही जंगलात पोहोचलो आहोत. काम सुरू आहे. आमच्यासमोर काम वेळेत आणि नैतिकतेनं पूर्ण करणं एक आव्हान आहे. पण कसलीही पर्वा न करता आम्ही ते करतोय. मनालीत पडलेल्या कडाक्याच्या थंडीत काम करणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट पुरवणा-या आमच्या टीमचे धन्यवाद. त्यांचं काम कौतुकास्पद आहे.”


सध्या ते ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्यस्त असून या व्यतिरिक्त ते ‘गुलाबो सिताबो’,’चेहरे’ या चित्रपटातही झळकणार आहेत. टीव्ही आणि चित्रपटांव्यतिरिक्त बिग बी जाहिरातींमध्येही बिझी आहेत. कल्याण ज्वेलर्स, कॅडबरी, डाबर, इमामी, आईसीआईसीआई बँक, नेरोलक, जेन मोबाइल, गुजरात टूरिज्मचे ते ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.हेही वाचा

तेलगु चित्रपट 'भागमती'चा लवकरच हिंदीत रिमेक

'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' बायोग्राफीचं अनावरण, बोनी कपूर भावूकसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा