Advertisement

'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' बायोग्राफीचं अनावरण, बोनी कपूर भावूक

श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' या बायोग्राफीचं अनावरण करण्यात आलं. सत्यार्थ नायक लिखित या बायोग्राफीचं अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हस्ते अनावरण झालं.

'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' बायोग्राफीचं अनावरण, बोनी कपूर भावूक
SHARES

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या खासगी आणि चित्रपट जीवनावर आधारित 'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' या बायोग्राफीचं अनावरण करण्यात आलं. सत्यार्थ नायक लिखित या बायोग्राफीचं अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हस्ते अनावरण झालं

बायोग्राफीची खासियत

या बायोग्राफीत सत्यार्थ यांनी श्रीदेवी यांच्या पाच दशकांच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. ज्या दिग्दर्शक आणि कलाकारांनी श्रीदेवीसोबत काम केलं, त्यांचे अनुभव या बायोग्राफीत आहेत. १९६९ मध्ये बालकलाकाराच्या रुपात श्रीदेवी पहिल्यांदा 'थुनाइवन' या चित्रपटात झळकल्या होत्या. तर २०१७ मध्ये आलेला 'मॉम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या प्रवासातील अनेक किस्से या बायोग्राफीत आहेत.बोनी कपूर झाले भावूक

बायोग्राफीच्या अनावरणाला श्रीदेेवी यांचे पती बोनी कपूर यांना आपल्या पत्नीच्या आठवणींनी गहिवरुन आलं. त्यांना अश्रू अनावर झाले. बोनी कपूर यांना भावूक झालेले बघून दीपिकानं त्यांचं सांत्वन केलं. या कार्यक्रमाला दिग्दर्शिका गौरी शिंदे उपस्थित होत्या. गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.


२०१८ साली निधन

श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झालं होतं. दुबईत त्या त्यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. ज्या हॉटेलमध्ये त्या वास्तव्याला होत्या, त्याच्या बाथटबमध्ये बुडाल्यानं त्यांचं निधन झालं होतं.हेही वाचासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा