Advertisement

महिला क्रिकेटर मिताली राजवर बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार मितालीची भूमिका

जगभरातील महिला क्रिकेटपटूंमध्ये मितालीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्ष पूर्ण केली आणि असं करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिचा हा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून पाहता येईल.

महिला क्रिकेटर मिताली राजवर बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार मितालीची भूमिका
SHARES

चित्रपटातल्या दमदार अभिनयामुळे तापसी पन्नू नेहमीच तिच्या चाहत्यांना प्रभावित करत असते. तापसीनं 'पिंक', 'नाम शबाना', 'मुल्क', 'बदला' 'गेम ओव्हर', आणि 'सांड की आँख' सारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता ती एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. लवकरच तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची बायोपिक करणार आहे. मिताली राजच्या वाढदिवशीच तापसीनं यासंदर्भात घोषणा केली.

मिताली राजचा आज ३७वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तापसी पन्नूनं तिचा वाढदिवस साजरा केला. याचा फोटो शेअर करत तिनं चाहत्यांसोबत एक चांगली बातमी देखील शेअर केली. त्या फोटोंसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये तापसी म्हणाली की, कर्णधार मिताली, तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मी तुला यंदाच्या वाढदिवशी काय गिफ्ट द्यावे हे मला माहिती नाही. मी तुला काय देऊ शकते तेदेखील मी सांगू शकत नाही, पण मी वचन देते की #शाबाशमिथू या बायोपिकच्या माध्यमातून माझ्या रूपात स्वतःला पडद्यावर पाहिल्यानं तुला अभिमान वाटेल”, असं तिनं ट्विटमध्ये लिहिलं आहे.


जगभरातील महिला क्रिकेटपटूंमध्ये मितालीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्ष पूर्ण केली आणि असं करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. आजवर भारतासाठी २०९ वनडे सामने खेळल्या. मितालीनं २६ जून १९९९ ला आयर्लंडविरुद्ध सामन्यातून वनडे कारकीर्दीची सुरुवात केली होती. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहेहेही वाचा

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीतीची जोरदार ट्रेनिंग

अमिताभ यांचे -३ डिग्रीमध्ये शूटिंग


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा