Advertisement

'पानिपत'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटलांना दिलासा नाहीच

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह इतर निर्मात्यांनी आपली कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केला होता.

'पानिपत'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,  विश्वास पाटलांना दिलासा नाहीच
SHARES

पानिपतकार विश्वास पाटील यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने पानिपत चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या शुक्रवारी पानिपत प्रदर्शित होणार आहे.  

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह इतर निर्मात्यांनी आपली कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केला होता. गोवारीकर यांच्यासह निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्याविरोधात विश्वास पाटील यांनी कॉपीराईट कायद्याअंतर्गत  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवली गेलेली दृश्य आणि घटना या आपण लिहिलेल्या कादंबरीतील कथेमध्ये साम्य आहे. त्यामुळे आपली परवानगी न घेता बनवलेला हा चित्रपट आपल्याला एकदा दाखवावा किंवा प्रदर्शनाआधी त्याची स्क्रीप्ट आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी विश्वास पाटील यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

उच्च न्यायालयाने विश्वास पाटील यांचा हा दावा अमान्य केला आहे. ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना कुणीही त्यावर आपला अधिकार सांगणं चुकीचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांनी सर्व प्रतिवादींना याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

 विश्वास पाटील यांनी १९८८ साली पानिपत ही कादंबरी लिहिली होती. पानिपतच्या ४२ आवृत्या आल्या आहेत. ही कादंबरी विविध भाषांत भाषांतरीत करण्यात आली आहे. त्यावर आधारित 'रणांगण' या नाटकाचे ४००  हून अधिक प्रयोग झाले आहेत.हेही वाचा -

महिला क्रिकेटर मिताली राजवर बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार मितालीची भूमिका

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीतीची जोरदार ट्रेनिंग
संबंधित विषय
Advertisement