Advertisement

अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीचा अपघात, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत गुरुवारी मुंबईत एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता रणवीर सिंहच्या गाडीचा अपघात, व्हिडिओ व्हायरल
SHARES

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत गुरुवारी मुंबईत एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्याला मार लागलेला नाही. तर गाडीचंही फारसं नुकसान झालेलं नाही. मात्र अपघातानंतर रणवीर आपल्या गाडीची अवस्था पाहण्यासाठी गाडीबाहेर आला. पॅपराजींनी त्या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंह डबिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला. मागून येणाऱ्या दुचाकीने रणवीर सिंह याच्या मर्सडीज SUV ला धडक दिली. त्यानंतर गाडीची अवस्था पाहण्यासाठी रणवीर गाडीतून उतरला. त्यानं गाडीला किती डॅमेज झालं असल्याचं पाहिलं. यात त्याला जास्त नुकसान झालेलं नसल्याचे दिसल्यावर तो पुन्हा गाडीत जाऊन बसला.

फोटोग्राफरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रणवीरच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.


रणवीर सिंह लवकरच फिल्म ८३ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण झालं आहे. हा चित्रपट ख्रिस्मसपर्यंत रिलिज होण्याची शक्यता आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा