Advertisement

७ वर्षांनंतर ऋषी आणि नितू कपूर 'या' चित्रपटातून करणार कमबॅक

बंगाली दिग्दर्शक शिबोप्रसाद मुखर्जी या दोघांना घेऊन चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत.

७ वर्षांनंतर ऋषी आणि नितू कपूर 'या' चित्रपटातून करणार कमबॅक
SHARES

आजारपणामुळे गेली अनेक वर्ष अभिनेता ऋषी कपूर चित्रपटसृष्टीपासून दूर होते. आता अमेरिकेतून उपचार घेऊन परतलेले ऋषी कपूर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते एकटेच नाही तर नितू कपूर देखील चित्रपटात कमबॅक करत आहेत. बंगाली दिग्दर्शक शिबोप्रसाद मुखर्जी या दोघांना घेऊन चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत.

'अशी' आहे कथा

बंगाली ‘पोस्टो’ या चित्रपटाचा दिग्दर्शक शिबोप्रसाद मुखर्जी हे हिंदीत रिमेक करणार आहेत. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. ही एका लहान मुलाची गोष्ट आहे. त्याचे आई वडिल परगावी नोकरी करीत असतात. त्यामुळे या बालकाला ते आजी आणि आजोबांकडे ठेवतात. अधून मधून ते मुलाच्या भेटीसाठी येत असतात. मुलाची आजी आजोबांसोबत गट्टी जमते. आई वडिलांहूनही त्याला प्रेमाची ऊब आजी आजोबांकडून मिळत असते. दरम्यान आई वडिलांची परदेशात बदली होते. ते मुलासह परदेशात जायाचे ठरवतात. मात्र त्याला आजी आजोबा विरोध करतात. मुलाची कस्टडी कोणाकडे असावी यासाठी हे प्रकरण न्यायालयात जाते. अशी वेगळी कथा ‘पोस्टो’ या चित्रपटाची आहे.

७ वर्षांनंतर एकत्र

ऋषी कपूर आणि नितू सिंग यात आजी आणि आजोबांची भूमिका साकारतील. यापूर्वी दोघांनी ‘बेशर्म’ या चित्रपटाच ७ वर्षापूर्वी एकत्र काम केलं होतं. यात त्यांचा मुलगा रणबीर कपूर याचीही भूमिका होती



हेही वाचा

वरुण धवन बनला 'Mr. लेले', या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

बॉलिवूडमधील 'ही' अभिनेत्री साकारणार महिला क्रिकेटपटूची भूमिका?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा