ऋषी कपूर यांच्या बहिणीचं निधन, अंत्यसंस्काराला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

ऋषी यांची मुलगी रिद्धीमा कपूरनं आत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली.

SHARE

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांची बहीण रितू नंदा यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. रितू नंदा या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाच्या सासू देखील होत्या. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ऋषी यांची मुलगी रिद्धीमा कपूरनं आत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली

निधनाची बातमी कळताच बच्चन आणि कपूर कुटुंबिय अंत्यसंस्कारांसाठी तातडीने दिल्लीला रवाना झालं. दिल्लीत रितू नंदा यांच्या घराबाहेरचे काही फोटो समोर आले. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्कारांसाठी गेल्याचं दिसतं.

बहिणीच्या अंत्यसंस्कारांसाठी ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर रितू यांच्या निवासस्थानी गेले. तसंच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय- बच्चन हेही तातडीनं रितू यांच्या घरी गेले.

रणधीर कपूर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रितू या कर्करोगाशी लढा देत असल्याचं सांगितलं होतं. २०१३ मध्ये ऋतू यांना कर्करोग झाल्याचं कळलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.हेही वाचा

'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी?

रामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला

संबंधित विषय
ताज्या बातम्या