Advertisement

हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर स्टारर हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे.

हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चा ट्रेलर रिलीज
SHARES

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर स्टारर हॉरर-कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. अर्जुन कपूरनं स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

पोस्टमध्ये ट्रेलर शेअर करताना अर्जुननं लिहिलं आहे की, 'हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असण्यासोबतच युनिकदेखील आहे. भूतांना घाबरवायचं असेल तर नक्की बघा. भूत पुलिस येत आहेत १७ सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर.'


ट्रेलरमध्ये सैफ आणि अर्जुन हे एकमेकांच्या पूर्णपणे उलट दाखवले आहेत. सैफ हा सतत मजा मस्ती करणारा तर अर्जुन हा सतत पुस्तकातील गोष्टींचा अभ्यास करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात सैफ आणि अर्जुन यांनी विभूती आणि चिरौंजी हे पात्र साकारलं आहेत. तर यामी गौतमच्या पात्राचं नाव माया तर जॅकलिनच्या पात्राचं नाव कनिका आहे. रमेश तौरानी आणि अक्शई पुरी हे चित्रपटाचं निर्माते आहेत. तर पवन कृपलानी याचे दिग्दर्शक आहेत.

हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १७ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

सैफ-करीनानं बांद्रामधलं घर दिलं भाड्यानं, 'इतकं' आहे घरभाडं

'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा