Advertisement

दबंग-३ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चुलबुल पांडे पुन्हा येतोय मनोरंजन करायला

लोकप्रिय चुलबुल पांडेच्या पात्रात सलमान परत एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे. २० डिसेंबरला रिलीज होणार चित्रपट...

दबंग-३ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चुलबुल पांडे पुन्हा येतोय मनोरंजन करायला
SHARES

सलमान खानचा बहुप्रतिक्षीत दबंग-३ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. लोकप्रिय चुलबुल पांडेच्या पात्रात सलमान परत एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येत आहे. सलमानसोबत चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप, सई मांजरेकर, प्रमोद खन्नादेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दमदार डायलॉग्स

ट्रेलमध्ये सलमानचे डायलॉग आधीच्या दोन चित्रपटातील डायलॉगपेक्षा दमदार आहेत. "एक होता है पुलिस वाला, एक होता है गुंडा, हम कहलाते हैं पुलिस वाला गुंडा।" "कोई दबंग पैदा नहीं होता है उसके पीछे एक कहानी जरूर होती है।" "अच्छाई और बुराई की लड़ाई में आपने सुना होगा जीत अच्छाई की होती है, गलत सुना है आपने। व्यक्तिगत दुश्मनी है बदला तो हम लेंगे ही।" असे दमदार डायलॉग्स चित्रपटात आहेत.

कधी होणार रिलीज?

चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभु देवानं केलं आहे. तर प्रोडक्शन सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदीचे आहे. चित्रपटाचं संगीत आधीच्या दोन चित्रपटांना संगीत देणारी जोडी साजिद-वाजिदनं दिले आहे.



हेही वाचा

'या' एका चुकीमुळे जान्हवी कपूर झाली ट्रोल

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा