SHARE

सलमान खान आणि प्रियांका चोप्रा मागील वर्षभरामधील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड सेलेब्स असल्याचं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आलं आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने काढलेल्या वार्षिक चार्टनुसार, सलमान आणि प्रियंका हे दोन्ही कलाकार सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ मध्ये ट्रेंडसेटर ठरल्याचं निदर्शनास आलं आहे.


लोकप्रियतेत दोघेही नंबर वन

स्कोर ट्रेंड रिपोर्टनुसार, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, न्यूजप्रिंट, डिजिटल न्यूज, आणि व्हायरल न्यूज या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर ५२ आठवड्यांपैकी २९ आठवडे सलमान खान सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत अग्र स्थानावर राहिला होता. हे कोणत्याही सेलिब्रिटीसाठी एक मोठं यश म्हणता येईल.

प्रियांकाला दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टची तगडी स्पर्धा होती. मात्र ५२ आठवड्यांमधील १५ आठवडे लोकप्रियतेत नंबर वन स्थानी राहिल्याने वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली प्रियंका ट्रेंडसेटर बनली आहे.


स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून यादी जाहीर

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे. १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून ही माहिती गोळा केली जाते.

विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर तसंच रँकिंगपर्यंत पोहोचलं जातं. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, सलमान आणि प्रियंका दोघंही ट्रेंडसेटर आहेत. सोशल प्लॅटफॉर्मवर ५२ आठवड्यांपर्यंत मजबूत पकड राखणं सोपं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या