Advertisement

हेरा फेरी दिग्दर्शक नीरज व्होरा यांचं निधन


हेरा फेरी दिग्दर्शक नीरज व्होरा यांचं निधन
SHARES

दौड, रंगीला, मन, विरासत यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. एक आठवड्यापूर्वीच नीरज व्होरा यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यांना अंधेरीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण गुरुवारी सकाळी मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

गुजरातमधील भूज इथं १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. नीरज व्होरा यांचे वडिल पंडित विनायक राज व्होरा हे शास्त्रीय संगीतकार होते. नीरज व्होरा यांच्या मातोश्रींना चित्रपटाची आवड होती. लहानपणी आईसोबत नीरज व्होरा हे चित्रपट पाहायचे. तिथूनच त्यांना चित्रपटात काम करण्याची आवड निर्माण झाली.


या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणून काम केलं. केतन मेहता यांच्या 'होली' या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. विनोदाची अचूक टायमिंग साधून प्रेक्षकांना हसवणारा आणखी कलाकार इथूनच बॉलिवूडला लाभला. 'हॅलो ब्रदर', 'रंगीला', 'मन', 'दौड', 'पुकार', 'बादशहा', 'सत्या', 'मस्त', 'अकेले हम अकेले तूम' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या विनोदी अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत आणि कंपनी चित्रपटांमध्ये देखील गंभीर भूमिका साकारल्या आहेत.    


कॉमेडी किंगची ट्रेजडी

नीरज व्होरा यांच्या वडिलांचे २००५ मध्ये तर २०१४ मध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पत्नीचेही निधन झालं. नीरज व्होरा यांच्या पश्चात कोणीही नव्हतं. गेल्या वर्षीच दिल्लीत नीरज यांना हृदयविकाराचा झटका आला होतात्याच दरम्यान ब्रेन हॅमरेजनं त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. काही दिवस ते कोमात होतेनिर्माता फिरोझ नाडियाडवाला यांच्या निवासस्थानी नीरज यांच्यावर उपचार सुरू होते. फिरोझ यांनी त्यांच्या घरातील एक खोली आयसीयूसारखीच तयार केली होती.    


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा