Advertisement

मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील कथित मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोई याने यापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
SHARES

पंजाबचा तरुण गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या मनप्रीत सिंग नावाच्या व्यक्तीला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मूसवाला हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर 'बॉलिवुडचा भाईजान' म्हणजेच सुपरस्टार सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड गोल्डी ब्रार याने हत्येची जबाबदारी घेतली. लॉरेन्स बिश्नोई हत्येप्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा कडक केली आहे.

ही तीच टोळी आहे, ज्याने अनेक वर्षांपूर्वी सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. पंजाबसारखी घटना मुंबई पोलिसांना नको आहे, त्यामुळे 'दबंग खान'ची सुरक्षा वाढवली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, मुंबई पोलिसांनी स्टारची संपूर्ण सुरक्षा वाढवली आहे. यासाठी मुंबई पोलीस सलमानच्या अपार्टमेंटच्या आसपास पहारा देणार आहेत.

याआधी 'हम साथ साथ है'च्या शूटिंगदरम्यान काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान बिश्नोईच्या रडारवर होता. लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळ्या हरणाला पवित्र मानतो आणि त्याची शिकार केल्याबद्दल सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सलमानच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2020 मध्ये अटक करण्यात आलेल्या बिश्नोईच्या जवळच्या साथीदारांपैकी एक राहुल उर्फ सुन्नी, त्याने सलमानला मारण्याचा कट रचल्याची कबुली दिली.

सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी हत्या करण्यात आली, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.



हेही वाचा

गायक केके यांचे निधनापूर्वीचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आरोप...

Singer KK Passes Away : डोक्यावर-चेहऱ्यावर जखमांचे निशाण? पोलिसांकडून चौकशीची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा