Advertisement

गायक केके यांचे निधनापूर्वीचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आरोप...

कोलकातामध्ये गायक केकेचा धक्कादायक मृत्यू झाल्याच्या काही तासांनंतरच सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

गायक केके यांचे निधनापूर्वीचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आरोप...
SHARES

कोलकातामध्ये गायक केकेचा (singer KK) धक्कादायक मृत्यू झाल्याच्या काही तासांनंतरच सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याला लाईव्ह शोमधून बाहेर घेऊन जात आहेत. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तो अस्वस्थ आहे हे दिसून येतंय.

लाईव्ह शोमधून केके यांना हॉटेलमध्ये घेऊन जात होते. हॉटेल रुममध्ये त्याला जास्त त्रास जाणवू लागला.  छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. पण रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये केके यांचा चेहरा पुसण्यासाठी ब्रेक घेतला. केके यांना भरपूर घाम येत असल्याचे दिसून आले. केके यांनी "बोहोत झ्यादा गरम है" असे देखील म्हणाले. एका क्षणी, केके स्टेजवर असलेल्या एका माणसाला हातवारे करताना दिसला आणि एअर कंडिशनिंगबद्दल बोलताना दिसला.

अनेक चाहत्यांनी हे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ज्यात अनेकांनी दावा केला की, एसी बंद होता. तर काहींनी यासाठी आयोजकांना जबाबदार ठरवलं आहे. गायकाच्या मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात असून पोस्टमॉर्टम अहवाल लवकरच अपेक्षित आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला आहे की, कोलकाता येथील नजरुल मंच सभागृह गर्दीने फुलले होते. नजरल मंचाची क्षमता सुमारे 2,400 असताना, सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की केके कॉलेज फेस्टसाठी परफॉर्म करत असलेल्या ठिकाणी आणखी बरेच लोक दाखल झाले होते.

केके, किंवा कृष्णकुमार कुन्नाथ, 'पल' आणि 'यारों' सारख्या बॉलीवूडमधील काही सर्वात हिट गाण्यांसाठी ओळखले जात होते. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात या गाण्यांची किशोरवयीन मुलांमध्ये चांगलीच क्रेझ होती.

केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगाली यासह इतर भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत.

शोक व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केकेच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांच्या मनातील भावभावनांची विस्तृत श्रेणी प्रतिबिंबित होते.हेही वाचा

Singer KK Passes Away : डोक्यावर-चेहऱ्यावर जखमांचे निशाण? पोलिसांकडून चौकशीची शक्यता

गायक केके यांच्या ‘या’ ५ गाण्यांवर तुम्ही कधी ना कधी रमलाच असाल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा