महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान चांगले मित्र होते. यामुळे भाईजानची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सिद्दीकींना रुग्णालयात दाखल केल्यावर सलमान शनिवारी टाईट सिक्युरिटीमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात तीन जणांचा अटक करण्यात आली असून त्यांचं संबंध बिश्नोई गँगशी असल्याचं पोलिस समोर आलं आहे.
दरम्यान, अभिनेता सलमान खानलाही बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती. काही महिन्यापूर्वी सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबारही करण्यात आला होता.
अभिनेता सलमान खानला पोलिसांनी रुग्णालयात येण्यापासून मनाई केली आहे. त्याला घरीच राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
बिग बॉसचं शूटिंग थांबवलं
दरम्यान, सलमान खाननं त्याचं बिग बॉस 18 शोचं शूटिंगही थांबवलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर भाईजान तात्काळ रुग्णालयात पोहोचला होता. त्यानंतर त्याला घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.