Advertisement

शाहरूख झाला 'झिरो'


शाहरूख झाला 'झिरो'
SHARES

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरूख खानने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या सिनेमात तो एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. गेल्या अनेक दिवसांपून या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे प्रेक्षक कमालिचे उत्सुक होते. अखेर नववर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नाव झिरो असं आहे.


टीझर लॉन्च

२१ डिसेंबर २०१८ रोजी झिरो हा सिनेमा प्रदर्शित होणार असून शाहरूखने ट्वीटरवर या सिनेमाचा टीझर लॉन्च केला आहे. हा टीझर पोस्ट करताना शाहरुखने 'टिकटें लिए बैठे हैं लोग मेरी जिंदगी की, तमाशा भी पूरा होना चाहीये' असं लिहीलं आहे. टीझरच्या सुरुवातीला आपल्याला शाहरूखचा झिरो अवतार दिसतो. या टीझरमध्ये शाहरूख 'तुमको हम पे प्यार आया' या जुन्या गाण्यावर नाचत असून चाहत्यांमध्ये तो हीट ठरला आहे.


शाहरूखबरोबरचे सहकलाकार कोण?

झिरोमध्ये शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. यात शाहरूखची व्यक्तीरेखा गेम ऑफ थ्रोन्स या इंग्रजी सिरीजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारीत आहे.


२०१७ मध्ये शाहरूख ठरला फ्लॉप

गेल्या वर्षी शाहरूख फ्लॉप ठरला. त्याचा जब हॅरी मेट सेजल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे २०१८ मध्ये येणारा झिरो हा सिनेमा कमाल करणार का? हे पहावं लागले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा