Advertisement

शाहिद कपूर पुन्हा बनला बाबा

मीरा अाणि शाहिद दुसऱ्यांदा अाई-बाबा बनले अाहेत. मीराने बुधवारी रात्री मुंबईतील हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.

शाहिद कपूर पुन्हा बनला बाबा
SHARES

शाहिद कपूर पुन्हा एकदा बाबा बनला अाहे. त्याची पत्नी मीरा राजपूतने बुधवारी रात्री मुंबईतील हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. अाई अाणि बाळाची तब्बेत चांगली असल्याचं कळतं. ही अानंदाची बातमी कळताच शाहिदची अाई नीलिमा अजीम अाणि लहान भाऊ इशान खट्टर यांच्यासहित संपूर्ण कुटुंब हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले.


एेतिहासिक नाव ठेवणार?

मीरा अाणि शाहिद दुसऱ्यांदा अाई-बाबा बनले अाहेत. याअगोदर मीराने २६ अाॅगस्ट २०१६ ला मुलीला जन्म दिला होता. मुलीचं नाव मीशा ठेवण्यात अालं अाहे. मीशा हे नाव मीरा अाणि शाहिदच्या नावातील पहिल्या अक्षरावरून बनलं अाहे. अाता मुलाचंही कोणतं तरी एेतिहासिक नाव शाहिद ठेवेल असं बोललं जात अाहे. शाहिद अाणि मीरा यांचं लग्न ७ जुलै २०१५ रोजी गुरगावमध्ये झालं अाहे. शाहिद मीरापेक्षा १३ वर्षाने मोठा अाहे.


बत्ती गुल मीटर चालू 

शाहिद बत्ती गुल मीटर चालू या अागामी चित्रपटामध्ये दिसणार अाहे. वीजेच्या मुद्यावर बनलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूरही असणार अाहे. हा चित्रपट २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार अाहे. यानंतर शाहिद अाॅक्टोबरमध्ये अर्जुन रेड्डी या तमीळ चित्रपटचा हिंदी रिमेक बनवण्यात व्यस्त असणार अाहे. 



हेही वाचा -

‘माझा अगडबम’चं शीर्षकगीताने ‘थरथरलं आसमान’

...आणि ‘बॉईज २’ची गोष्ट सुचली




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा