Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

‘माझा अगडबम’च्या शीर्षकगीताने ‘थरथरलं आसमान’

‘अगडबम’च्या सिक्वेलमधून नाजूका पुन्हा भेटणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड' कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ या सिक्वेलचं शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं आहे. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असं हे गीत आहे.

‘माझा अगडबम’च्या शीर्षकगीताने ‘थरथरलं आसमान’
SHARES

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या ‘नाजुका’च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. ‘अगडबम’च्या सिक्वेलमधून ती पुन्हा भेटणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड' कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ या सिक्वेलचं शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं आहे. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असं हे गीत आहे.


आसमान का थरथरते...

‘आसमान का थरथरते...’ असे बोल असलेलं हे शीर्षकगीत मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलं आहे. या एनर्जेटिक गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांचं संगीत लाभलं आहे. अपेक्षा दांडेकरच्या दमदार आवाजामुळे हे गाणं अधिकच वजनदार बनलं आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरवर चित्रित करण्यात आलेलं हे शीर्षकगीत प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, अशी आशा ‘माझा अगडबम’ च्या टीमने व्यक्त केली आहे.


तृप्ती मुख्य भूमिकेत

‘माझा अगडबम’ या सिनेमात तृप्ती मुख्य भूमिकेत असून, दिग्दर्शन, लेखन आणि निर्माती अशा चार वेगवेगळ्या भूमिकांमधून ती लोकांसमोर येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमाच्या निर्मितीफळीत तृप्ती भोईरला टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांची साथ लाभली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. ‘अगडबम’च्या दमदार यशानंतर डबल धमाका करण्यास सज्ज असलेला ‘माझा अगडबम’ येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

Exclusive: अबब, ३०० किलोंची नाजूका बनली दिग्दर्शिका!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा