Advertisement

येतोय ‘अगडबम’चा सिक्वेल

‘अगडबम’ हा सिनेमा आपल्याला आठवत असेलच. या सिनेमात निर्माती-अभिनेत्री तृप्ती भोईरने एका लठ्ठ तरुणीची भूमिका साकारली होती. आता याच सिनेमाचा सिक्वेल ‘माझा अगडबम’ या शीर्षकाअंतर्गत प्रदर्शित होणार आहे.

येतोय ‘अगडबम’चा सिक्वेल
SHARES

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अगडबम’ हा सिनेमा आपल्याला आठवत असेलच. या सिनेमात निर्माती-अभिनेत्री तृप्ती भोईरने एका लठ्ठ तरुणीची भूमिका साकारली होती. आता याच सिनेमाचा सिक्वेल ‘माझा अगडबम’ या शीर्षकाअंतर्गत प्रदर्शित होणार आहे.


टीझर पोस्टर प्रदर्शित

‘माझा अगडबम’चं पहिलं टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये एक लठ्ठ स्त्री पाठमोरी उभी असल्याचं पाहायला मिळतं. हिच्या डोक्यावर शिवकालीन मावळ्यांची पगडी आहे. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या या तरुणीने केस मोकळे सोडलेले असून, पाठीवर छाल-तलवारीचं चित्र असलेला अंगरखा परिधान केला आहे.

आजूबाजूचं वातावरण पाहता ती एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात उभी असल्याचं जाणवतं. या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार आहे त्यावरून हळूहळू पडदा उठेलच.


नाजुकाच्या भूमिकेत कोण?

‘अगडबम’च्या पहिल्या भागात तृप्ती भोईर आणि मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या जोडीला उषा नाडकर्णी, चित्रा नवाथे, विकास समुद्रे आदी कलाकार होते.

टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह ‘माझा अगडबम’ सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. पहिल्या भागाचं दिग्दर्शन सतिश मोतलिंगने केलं होतं, तर दुसऱ्या भागात अभिनय आणि निर्मितीसोबतच दिग्दर्शनाची धुराही तृप्तीनेच सांभाळली आहे.

सुबोधचा नवा अंदाज

‘अगडबम’मध्ये तृप्तीने नाजुका साकारली होती. ‘माझा अगडबम’मध्ये नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे, अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. २६ आॅक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.


हेही वाचा - 

पोलिसांची सूचना धुडकावली, अभिनेत्री शिबानी दांडेकरनं केलं किकी चॅलेंज

आजच्या पिढीची कथा ‘टेक केअर गुड नाईट’ : पर्ण पेठे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा