SHARE

भारतीय मॉडल आणि अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळं चर्चेत आली आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर किकी चॅलेंजचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुंबई पोलिसांनी किकी चॅलेंजमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कुणीही असे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू नका, असं आवाहन केलं होतं. तरीही शिबानीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे शिबानीवर कारवाई व्हायला हवी की नको यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.


मुंबई पोलिसांचं आवाहन

किकी चॅलेंजमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून किकी चॅलेंज धोक्याचं असल्याने असे प्रकार करू नये, असं आवाहन मुंबईकरांना केलं होतं. एवढंच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी किकी चॅलेंज करणाऱ्या काही तरूणांना पकडून त्यांना शिक्षाही केली होती. तरीही किकी चॅलेंजचं खुळ मुंबईकरांच्या डोक्यातून जात नसल्याचं दिसून येत आहे.काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिबानी कारमधून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत शिबानीची मैत्रीण मोनिका डोग्रा देखील किकी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शिबानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.


व्हिडिओ कुठला?

हा व्हिडिओ मुंबईकर शिबानीने तिच्या अकाऊंटवर पोस्ट केला असला, तरी तिने हा व्हिडिओ अमेरिकेतील लाॅस एन्जेलिस शहरात शूट केलेला आहे. त्यामुळे मुंबई पोलिस तिला समज तरी देतील की नाही? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.हेही वाचा-

किकी चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा

ट्रेनमधलं किकी चॅलेंज अंगलट, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षासंबंधित विषय
ताज्या बातम्या