Advertisement

आजच्या पिढीची कथा ‘टेक केअर गुड नाईट’ : पर्ण पेठे

'टेक केअर गुड नाईट’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारी आहे.

आजच्या पिढीची कथा ‘टेक केअर गुड नाईट’ : पर्ण पेठे
SHARES

‘वाय झेड’, ‘फास्टर फेणे’, ‘फोटोकॉपी’ या सिनेमांमुळे पर्ण पेठे हे नाव मराठी सिनेरसिकांमध्ये चांगलंच परिचयाचं झालं आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘टेक केअर गुड नाईट’ मराठी सिनेमात पर्ण पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. 

 ३१ ऑगस्टला प्रदर्शित होण्यास या सिनेमात पर्णसोबत सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. गिरीश जयंत जोशी यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.


सायबर क्राइमवर आधारित

ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारी आहे. हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्याचं काम करेल. ‘टेक केअर गुड नाईट’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुलं असं हे एक गोड कुटुंब आहे.


वेगळ्याच मुलांचं प्रतिनिधीत्व 

शाळेमध्ये काही मुलं खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात अशाच मुलांकडे सगळ्यांचं लक्ष असतं.  पण अशी काही मुलं पण असतात ती खूप हुशार नसतात व ती दंगेपण करत नाहीत अशा मुलांचे ही मुलगी प्रतिनिधित्व करत असते. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाइल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चॅटिंग करताना अचानक काही प्रॉब्लेम येतात. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे.   


दिग्गजांसोबत संधी

मी इरावती हर्षे यांची चाहती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे मी भाग्यच समजते. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर हे देखील दिग्गज कलाकार आहेत. सेटवर त्यांच्याकडून तसंच आदिनाथ कोठारे आणि लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या.


नेहमीच काळजी घ्या

सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी सिनेमा आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा मनोरंजनासोबत डोळे उघडण्याचंही काम करेल.हेही वाचा-

‘प्रँक’ करताना नम्रताचा उडाला थरकाप!

सुबोध बायकोला घाबरतो?
संबंधित विषय
Advertisement