Advertisement

रणवीर सिंगला मराठी शिकवणाऱ्या हृषिकेशला अशी सुचली ‘बॉईज २’ची गोष्ट

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज २’मध्येही बॉईजची तीच धम्माल मस्ती अनुभवता येणार आहे. मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचल्याचं विशाल देवरुखकर यांचं म्हणणं आहे.

रणवीर सिंगला मराठी शिकवणाऱ्या हृषिकेशला अशी सुचली ‘बॉईज २’ची गोष्ट
SHARES

‘बॉईज’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा सिक्वेल असलेल्या ‘बॉईज २’ची चर्चा चांगलीच रंगत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज २’मध्येही बॉईजची तीच धम्माल मस्ती अनुभवता येणार आहे. मात्र, या सिनेमाची गोष्ट एका घटनेने सुचल्याचं विशाल देवरुखकर यांचं म्हणणं आहे.


आणि गोष्ट सापडली

‘बॉईज’ सुपरहिट ठरल्यानंतर त्याच्या सिक्वेलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणेदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अशा विषयाच्या शोधात मी आणि ऋषिकेश कोळी होतो. चार-पाच महिने उलटूनही आम्हाला काहीच सूचत नव्हतं. एकदा अचानक माझा फोन बंद झाला आणि त्यातूनच ‘बॉईज २’ची गोष्ट आम्हाला सापडली, असं विशाल देवरुखकर यांनी सांगितलं.


‘बॉईज’ची पुन्हा धम्माल

अवघ्या दोन-तीन तासांसाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर आपली इतकी अवस्था वाईट होऊ शकते, तर कॉलेज तरुणांसाठी त्यांचा फोन किती महत्त्वाचा असेल? असा प्रश्न विशाल यांना पडला. त्यांनी लगेच हा विचार ऋषिकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेही त्याला पसंती देत ‘बॉईज २’चं लिखाण सुरू केलं. अशा या अनावधानाने सुचलेल्या ‘बॉईज २’ चित्रपटामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या ‘बॉईज’ची धम्माल पाहायला मिळणार आहे.


जागतिक स्तरावर वितरण

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे. याशिवाय इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचं जागतिक स्तरावर वितरणही केलं जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा -

सिंगापूरपर्यंत पोहोचलेल्या 'बॉईज'ची पन्नाशी !

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा