शाळेतल्या करामतींनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’मध्ये डबल धमाका करण्यास येत आहेत. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे या पोस्टरनंतर ‘बॉईज २’चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला आवडेल असा आहे. द्विअर्थी संवाद आणि तशाच काहीशा अर्थाचं ‘गोटी सोडा, बाटली फोडा...’ हे गाणं या सिनेमात आहे. गिरीश कुलकर्णीचा विनोदी अंदाजही या टीझरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंन्मेंट प्रस्तुत 'बॉईज २' हा सिनेमा महाविद्यालयीन तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’चा हा सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
ऋषिकेश कोळीच्या संवादलेखनाची बरसात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखीलल केलं जाणार आहे.
हेही वाचा -