Advertisement

सिंगापूरपर्यंत पोहोचलेल्या 'बॉईज'ची पन्नाशी !


सिंगापूरपर्यंत पोहोचलेल्या 'बॉईज'ची पन्नाशी !
SHARES

मराठी सिनेमा बदलतोय हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी सातासमुद्रापार मराठी सिनेमाने आपला झेंडा रोवला आहे. आता काही सिनेमा फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याबाहेरही प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यातलाच एक सिंगापूरपर्यंत जाऊन आपली जादू पसरवणारा 'बॉईज' हा सिनेमा. 'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. 'बॉईज'ची रंगीत दुनिया मांडणाऱ्या या सिनेमाचे महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये १५०० हून अधिक शोज सुरु आहेत.



सिंगापूरला तर स्थानिक मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशेष मागणीमुळे 'बॉईज' सिनेमाचे खास स्क्रीनिंग सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे फक्त मुंबईच नाही, तर महाराष्ट्राबाहेर पण बॉईज सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तीन मित्रांचे विश्व मांडणा-या या सिनेमात विनोदाचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळतो.



सुप्रसिद्ध संगीतकार आणि सिनेदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती या सिनेमाला लाभली असून, विशाल देवरुखकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या तिकडीची 'बॉईज'गिरी या सिनेमामध्ये पहायला मिळत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा