Advertisement

सेलिब्रेटिंच्या पत्नी आरशासमोर उभं राहून... शर्लीन चोप्राचा खुलासा

बॉलिवूड पार्टींमध्ये कशाप्रकारे ड्रग्जचे सेवन केले जाते यावर तिनं वक्तव्य केलं आहे.

सेलिब्रेटिंच्या पत्नी आरशासमोर उभं राहून... शर्लीन चोप्राचा खुलासा
SHARES

अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुलाखत सध्या फार चर्चेत आहे. बॉलिवूड पार्टींमध्ये कशाप्रकारे ड्रग्जचे सेवन केले जाते यावर तिनं वक्तव्य केलं आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तिनं ही मुलाखत दिली होती. यात तिनं कुठल्या सेलिब्रिटिचं नाव घेतलं नाही. पण IPL मधील KKR चा संघ जिंकल्यानंतरच्या पार्टीचा तिनं उल्लेख केला आहे.

ती म्हणाली की, मी कोलकात्याला गेले, सामना पाहिला. त्या रात्री केकेआरचा संघ जिंकला. विजयानंतर पार्टी ठेवण्यात आली होती. केकेआरचे खेळाडू, त्यांची गर्लफ्रेंड, शाहरुख खान, शाहरुखचे जवळचे मित्र, त्यांच्या पत्नी सर्व त्यारात्री पार्टी करत होते. हळूहळू मी पाहिले की धूर केला जात होता. तसंच इतर काही पदार्थांचे सेवन केलं जात असल्याचं शर्लिननं म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली, मी नाचून कंटाळले आणि वॉशरूममध्ये गेलो. मी जेव्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि, तेव्हा मी जे पाहिले ते माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. मी विचार करत होते की मी चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहे का, मग मी विचार केला की आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत. मग हे लोक इथं काय करत आहेत? मी अनेक सेलिब्रेटिंच्या पत्नींना तिथं आरशासमोर उभं राहून पांढरी पावडर ज्याला आपण कोकेन म्हणतो ते घेताना पाहिलं.

हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. जर अचानक असं दृश्य तुम्हाला दिसलं, तर तुम्हाला थोडा धक्का बसतो. माझी नेमकी तीच प्रतिक्रिया होती. मी कसे तरी तिथून बाहेर पडले, कारण मला त्यात सहभागी व्हायचे नव्हते. बाहेर आल्यानंतर मी पाहिले की प्रत्येकजण आपापल्या प्रकारे पार्टीचा आनंद घेत होता. तिथे एक वेगळेच वातावरण होतं. मग मी शाहरुख खान आणि त्याच्या मित्रांना भेटायला गेल्याचं शर्लिन म्हणाली.

मला मग समजलं की, बॉलिवूडमध्ये कोणत्या प्रकारच्या पार्ट्या होतात. आनंदासाठी कोणते पदार्थ वापरले जातात? सहसा, जेव्हाही मोठा कलाकार पार्टी आयोजित करतो, तो निश्चितपणे ड्र्ग्ज देतो. कारण असं मानलं जातं की, जोपर्यंत तुम्ही ड्रग्जचे सेवन करत नाही, तोपर्यंत उत्साह वाढत नाही आणि पार्टीसाठी ते आवश्यक असल्याचं शर्लिननं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.



हेही वाचा

तिथे फक्त आर्यनच होता का? मिका सिंगनं उपस्थित केला प्रश्न

PM नरेंद्र मोदींनी शेअर केला नट्टू काकांचा फोटो, जुन्या आठवणींना उजाळा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा