Advertisement

श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवला जात आहे.

श्रेयस तळपदेचा ‘कौन प्रवीण तांबे?’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
SHARES

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवला जात आहे.

महेंद्रसिंह धोनी, कपिल देव यानंतर आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचं नाव जोडलं जाणार आहे. क्रिकेटमधील क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

कौन प्रवीण तांबे? असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा कौन प्रवीण तांबे? या चित्रपटात क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांची भूमिका साकारत आहे.

क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या प्रस्तावनेतून या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. यात श्रेयस तळपदे हा एका नवीन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात त्याची एक अनोखी शैलीही पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यात फक्त प्रवीण तांबे याच्या क्रिकेट खेळण्याबद्दल नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितलं जाणार आहे. जवळपास २ मिनिटे ५१ सेकंदाच्या या ट्रेलरच्या सुरुवातीला श्रेयस तळपदे गोलंदाजी करताना दिसत आहे. यानंतर त्याचा संघर्षही दाखवला जातो.

चित्रपटात त्याचे वैयक्तिक आयुष्य, नोकरी, टोमणे, लग्न आणि नंतर बायकोसोबत होणारी भांडणं या सर्व गोष्टी उलगडणार आहेत.

प्रवीण तांबेनं नोकरी करत असतानाही क्रिकेट सोडलं नाही आणि त्यानंतर त्यानं त्याचं स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण केलं, याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

८ जून १९७१ रोजी प्रवीण तांबे यांचा जन्म झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात ते सहभागी होते. प्रवीण तांबे हे ४१ वर्षांचे असताना त्यांनी राजस्थान रॉयल्समधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

जयप्रदा देसाई यांनी ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदेशिवाय आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी आणि अंजली पाटील हे कलाकार झळकणार आहेत. येत्या १ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.



हेही वाचा

International Womens Day 2022 : ५५व्या वर्षीही बॉडीबिल्डींगमध्ये ‘तिचा’ डंका

IPL 2022 साठीची नियमावली जाहीर, ‘हे’ आहेत निर्बंध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा