Advertisement

IPL 2022 साठीची नियमावली जाहीर, ‘हे’ आहेत निर्बंध

IPL संदर्भातील नियमावली महाराष्ट्र सरकारनं बुधवारी जाहीर केले.

IPL 2022 साठीची नियमावली जाहीर, ‘हे’ आहेत निर्बंध
SHARES

२६ मार्चपासून IPL चे सामने मुंबईत होणार आहेत. यासंदर्भातील नियमावली महाराष्ट्र सरकारनं बुधवारी जाहीर केली. बुधवारी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि आयपीएलशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारनं आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची तयारी आहे.

संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल.

मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर ५५ सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय १५ सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयनं सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.

यावेळी मुंबईत (Mumbai) एकूण ५५ सामने होणार आहेत, त्यामुळे ८ मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात होईल. यानंतर हे खेळाडू क्वारंटाइन असतील. त्यानंतर १४ ते १५ मार्चपर्यंत आयपीएल संघ सराव करू शकतील.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी प्रत्येकाला RT-PCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.

आयपीएल २६ मार्चपासून सुरू होणार असून ही स्पर्धा २९ मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलमध्ये एकूण ७० लीग सामने खेळवले जाणार आहेत, यावेळी एकूण १२ डबल हेडर सामने असू शकतात. म्हणजेच १२ दिवस असे असतील ज्या दिवशी दोन सामने खेळवले जातील.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने होणार आहेत, तर १५ सामने सीसीआय स्टेडियमवर होणार आहेत, याशिवाय २० सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर एकूण १५ सामने होणार आहेत.

यावेळी आयपीएलमध्ये एकूण १० संघ सहभागी होत आहेत. त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

गट-अ मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहेत. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.



हेही वाचा

मुंबईत २६ मार्चपासून IPL सामने, पण...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा