जमली रे जमली सोनाक्षी-नवाजची जोडी

सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कधी नवोदितांच्या, तर कधी अनुभवी कलाकारांच्या. अशीच एक नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही जोडी आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची…

SHARE

सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कधी नवोदितांच्या, तर कधी अनुभवी कलाकारांच्या. अशीच एक नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही जोडी आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची…

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’ या सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘फोटोग्राफ’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘दबंग’ गर्ल सोनाक्षी सिन्हा ‘टोटल धमाल’ या सिनेमातील ‘मुंगडा…’ या रिक्रिएटेड साँगमध्ये थिरकणार असल्याने लाइमलाईटमध्ये आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे सोनाक्षीच्या याच गाण्याची जोरदार चर्चा आहे. अशातच हे दोन कलाकार एकत्र येणार असल्याची बातमी येणं ही जणू सिनेचाहत्यांसाठी खुशखबरच आहे.


आनस्क्रीन जोडीदार

‘मुंगडा…’खेरीज ‘कलंक’ या आगामी सिनेमातही झळकणार असल्याने सोनाक्षी लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमाखेरीज सोनाक्षीकडे आणखी एका सिनेमाची ऑफर असून, त्यात ती नवाजुद्दीनसोबत दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी सिनेनिर्मितीकडे वळला आहे. ‘बोले चुडियां’ असं शीर्षक असलेल्या या हिंदी सिनेमातच सोनाक्षी-नवाजुद्दीन ही जोडी दिसणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीनसोबत कोणती अभिनेत्री घ्यावी? हा प्रश्न मागील काही दिवसांपासून शमासला सतावत होता. अखेर सोनाक्षीच्या रूपात त्याला नवाजुद्दीनची आनस्क्रीन जोडीदार मिळाली.


शूटिंगला लवकरच सुरुवात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षीनंही ‘बोले चुडियां’मध्ये नवाजुद्दीनची नायिका बनण्यासाठी होकार दिला आहे. कथा आवडल्यानं तिनं हा सिनेमा स्वीकारल्याचं समजतं. या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. पदार्पणातच सलमान खानसोबत जोडी जमवणाऱ्या सोनाक्षीनं आपल्या सर्वच सिनेमांमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. नवाजुद्दीनचीही जोडी अनपेक्षितपणे बऱ्याच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत जमल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे या दोन मोठ्या कलाकारांची आनस्क्रीन केमिस्ट्री कशी जुळते ते पाहायचं आहे.हेही वाचा -

मुंबईतील आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता

विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या