Advertisement

मुंबईतील आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता

स्वायत्तेचा दर्जा मिळालेल्या कॉलेजांमध्ये मुंबईतील तीन कॉलेज, नागपूर एक, अमळनेरमधील एका कॉलेजचा समावेश आहे. यामुळं राज्यातील स्वायत्त कॉलेजांची संख्या ७३ झाली असून, मुंबईतील २३ वर पोहोचली आहे.

मुंबईतील आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता
SHARES

मुंबईतील आर. ए. पोद्दार कॉलेज, निर्मला निकेतन सोशल वर्क कॉलेज, एम.एम. शहा कॉलेज या तीन कॉलेजांना विद्यापीठ अनुदान आयोगानं (युजीसी) स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. नुकत्याच स्वायत्तेचा दर्जा मिळालेल्या कॉलेजांमध्ये मुंबईतील तीन कॉलेज, नागपूर एक, अमळनेरमधील एका कॉलेजचा समावेश आहे. यामुळं राज्यातील स्वायत्त कॉलेजांची संख्या ७३ झाली असून, मुंबईतील २३ वर पोहोचली आहे.


स्वायत्ततेचं वैशिष्ट्य काय?

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या स्वायत्त कॉलेजांना त्यांचा अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. तसंच नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षांबाबतही स्वातंत्र्य मिळतं. यानुसार आता मुंबईतील तीन, नागपूरमधील एक, अंमळनेरमधील एक अशा पाच कॉलेजांना हे स्वातंत्र्य मिळणार आहे.


रुसामार्फत पाच कोटींचा निधी

'नॅक' मूल्यांकनात ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता देण्याचं धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जाहीर केलं आहे. त्यानंतर राज्यातील गुणवान असलेल्या अनेक कॉलेजांनी स्वायत्तता प्रक्रियेची सुरुवात केली होती. यातील काही कॉलेजांना यापूर्वी स्वायत्तता देण्यात आली आहे. या यादीत काही दिवसांपूर्वी एसएनडीटी महिला विद्यापीठातील भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, खार येथील एच. जे. कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल येथील चांगू काना ठाकूर कॉलेज या कॉलेजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर नुकतंच पाच कॉलेजांना स्वायत्तेचं पत्र मिळालं असून, यांना पहिल्या पाच वर्षासाठी शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली आहे. त्याशिवाय या कॉलेजांना रूसा मार्फत पाच कोटींचा निधीही उपलब्ध होणार आहे.

राज्यात पाच वर्षांपूर्वी स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजांची संख्या ३६ असून, आता ती ७३ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पाच कॉलेजांना स्वायत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नुकतीच ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, स्वायत्तता मिळालेल्या कॉलेज व्यवस्थापनाला काम करण्याची मोकळीक मिळणार आहे.


यांना मिळाली स्वायत्तता...


  • रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनोमिक्स, माटुंगा
  • निर्मला निकेतन सोशल वर्क कॉलेज, चर्चगेट
  • मनीबेन एम. पी. शहा महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉर्मस, माटुंगा
  • तिरपुडे कॉलेज – नागपूर
  • प्रताप महाविद्यालय - अंमळनेर



हेही वाचा -

आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक

अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा