Advertisement

विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर

सोमवारी रात्री मुंबई विद्यापीठानं नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर केले आहेत. यात तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र व ह्युमन सायन्स सत्र पाच हे विज्ञान शाखेचे दोन आणि बीई संगणक अभियांत्रिकी व बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र सात या अभियांत्रिकीचे शाखेचे दोन अशा एकूण चार परीक्षांचा समावेष आहे.

विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर
SHARES

सोमवारी रात्री मुंबई विद्यापीठानं नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या विज्ञान व अभियांत्रिकीचे चार निकाल जाहीर केले आहेत. यात तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र व ह्युमन सायन्स सत्र पाच हे विज्ञान शाखेचे दोन आणि बीई संगणक अभियांत्रिकी व बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र सात या अभियांत्रिकीचे शाखेचे दोन अशा एकूण चार परीक्षांचा समावेष आहे. या चारही परीक्षांमध्ये एकूण १२ हजार १६८ विद्यार्थी बसले असून, एकूण १० हजार ००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत १७२ परीक्षांचे निकाल विद्यापीठानं जाहीर केले आहेत.


निकालाची आकडेवारी

तृतीय वर्ष बीएससी संगणकशास्त्र सत्र पाच च्या परीक्षेत ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३७८ विद्यार्थी या परीक्षेस बसले असून, यातील २ हजार ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ७१.९६ % एवढी आहे, तर बीई संगणक अभियांत्रिकी सत्र सात या परीक्षेत ५ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५ हजार ५१७ विद्यार्थी परीक्षेस बसले असून, यातील ५ हजार १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ९३.४२ % एवढी असून, फक्त ३६१ विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. तसंच बीई स्थापत्य अभियांत्रिकी सत्र सातच्या परीक्षेत ३ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३ हजार २५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील २ हजार ५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर या निकालाची टक्केवारी ७८.१२ % एवढी आहे.


५४ हजार ४३० उत्तरपत्रिका, १ हजार ४७६ शिक्षक

या चारही परीक्षांमध्ये मिळून एकूण १२ हजार १६८ विद्यार्थी बसले असून, यात १० हजार ००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान या चारही परीक्षांमध्ये ५४ हजार ४३० उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन करण्यात आल आहे. या उत्तरपत्रिका १ हजार ४७६ शिक्षकांनी तपासल्या आहेत व यातील १२ हजार ९७२ उत्तरपत्रिकांचं मॉडरेशन करण्यात आलं.



हेही वाचा -

एसटीच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज दाखल

आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा