Advertisement

श्रीदेवी यांचं पार्थिव सोमवारी मुंबईत पोहोचणार


श्रीदेवी यांचं पार्थिव सोमवारी मुंबईत पोहोचणार
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, त्यांच्या चाहत्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण, श्रीदेवी यांचं पार्थिव सोमवारी उशीरा मुंबईत दाखल होणार आहे.


पवनहंसमध्ये होणार अंतिम संस्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांच्या आप्तस्वकीयांनी जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीमध्ये जाऊन तपासणी केली आहे. शिवाय, अंतिम संस्कार कशा पद्धतीने करावयाचे, याविषयीही काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत.


पार्थिव आधी 'भाग्यलक्ष्मी'वर

उद्या म्हणजेच सोमवारी दुपारच्या सुमारास श्रीदेवी यांच्या पार्थिवावर पवनहंस येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणल्यानंतर अंधेरीतील भाग्यलक्ष्मी या बंगल्यावर नेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास पार्थिव पवनहंस स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल.


पार्थिवावरची शवविच्छेदन प्रक्रिया लांबली

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाली ७ वाजेपर्यंतही श्रीदेवी यांच्या मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झालेली नसून त्यानंतरच पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे, पार्थिव मुंबईत पोहोचण्यास अजून उशीर लागण्याची शक्यता आहे.

शनिवारी मध्यरात्री दुबईमध्ये हॉटेलच्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे अभिनेत्री श्रीदेवी बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात अॅम्ब्युलन्समधून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यातच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.



हेही वाचा

श्रीदेवी यांचा 'शिद्दत' चुकला, 'झिरो' ठरला शेवटचा चित्रपट

याही बॉलिवुड कलाकारांचं ह्रदयविकाराने झालं होतं अकस्मिक निधन


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा