२०१८ मध्ये, आदित्य धर दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आणि विकी कौशल अभिनित ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट सर्वांच्याच चांगला लक्षात असेल. आता हे त्रिकुट आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाचं नाव आहे 'अश्वत्थामा'.
महाभारताच्या अध्यायातील एका पात्रावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
विक्की कौशलनं 'अश्वत्थामा' हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणून वर्णन केलं आहे. आदित्य आणि रॉनीबरोबर पुन्हा काम करणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही आधी उरीसाठी एकत्र काम केलं आहे.
विक्की म्हणतो, “अश्वत्थामा हा आदित्यचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी तो रॉनीसारख्या दूरदर्शी लोकांना प्रेक्षकांसमोर आणण्याची गरज होती. अभिनेता म्हणून माझ्यासाठी ही एक नवीन जागा असेल जिथे मला अभिनयाबरोबरच तंत्रज्ञानाचे नवीन रूप देखील दिले जाईल. या आश्चर्यकारक संघासह लवकरच मी येईन."