Advertisement

विद्या बालनच्या शेरणी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

विद्या बालन स्टारर 'शेरनी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

विद्या बालनच्या शेरणी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

विद्या बालन (Vidya Balan) स्टारर 'शेरनी' (Sherni) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. सोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. जगातील २४०हून अधिक देशांमध्ये १८ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अमेझॉन प्राइमवर (Amazon prime) हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटात ती महिला वन अधिकाऱ्याच्या (Forest Officer) भूमिकेत दिसतेय. टी-सिरीज (T-series) आणि अबंडनतिया एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल विद्या बालन म्हणाली, “मी पहिल्यांदा शेरनी’चं कथानक ऐकलं आणि ते मला भावलं. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली चित्रपटातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणं आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेलं आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारं आहे.”

दिग्दर्शक अमित मसुरकर म्हणाले, “शेरनी’च्या कथानकाला काटेरी पैलू आहेत. या निमित्ताने मनुष्य आणि पशू यांच्यातील संघर्षाची जटिलतेचा वेध घेण्यात आला आहे. विद्या बालननं मीड-लेव्हल फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारली असून अडथळे आणि तणावपूर्ण स्थितीतही ती आपल्या टीम आणि स्थानिकांसह पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम करत असते.”


हेही वाचा

सलमान खानच्या नोटीसनंतर KRKनं ट्विटर अकाऊंट केलं प्रायव्हेट

बच्चा कंपनी स्माईल! आता चुलबुल पांडे अॅनिमेटेड अवतारात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा