Advertisement

'जंगली' सिद्धिविनायकाच्या दारी!

अभिनेता विद्युत जमवाल सध्या आपल्या 'जंगली' या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाला काही दिवस उरले असताना विद्युतची पावलंही सिद्धिविनायकाची वाट चालू लागली. विद्युतनं नुकतीच सिद्धिविनायक मंदिराला भेट देत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

'जंगली' सिद्धिविनायकाच्या दारी!
SHARES

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ही सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वांचंच श्रद्धास्थान आहे. याच कारणामुळं आपला एखादा महत्त्वाकांक्षी सिनेमा प्रदर्शित होणार असला की, बाॅलीवूडमधील आघाडीचे तारेही सिद्धिविनायकच्या मंदिरात चमकू लागतात. विद्युत जमवालने जेव्हा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, तेव्हा पुन्हा एकदा याची प्रचिती आली.


बाप्पाला प्रार्थना

अभिनेता विद्युत जमवाल सध्या आपल्या 'जंगली' या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाला काही दिवस उरले असताना विद्युतची पावलंही सिद्धिविनायकाची वाट चालू लागली. विद्युतनं नुकतीच सिद्धिविनायक मंदिराला भेट देत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 'जंगली' या सिनेमाला प्रेक्षकांचा कौल मिळू दे आणि हा सिनेमा बॅाक्स आॅफिसवर भरघोस यश मिळवू दे जणू अशीच काहीशी प्रार्थना यावेळी विद्युतनं सिद्धिविनायकाला केली असावी.


५ एप्रिलला प्रदर्शित

या वेळी विद्युतसोबत पूजा सावंत आणि आशा भट या 'जंगली'मधील त्याच्या सहकलाकारही उपस्थित होत्या. या दोघींनीही बाप्पाकडं सिनेमा यशस्वी होण्यासाठी साकडं घातलं आणि आशीर्वाद घेतला. ए जंगली पिक्चर्स प्रॅाडक्शनची निर्मिती असलेला 'जंगली'चं दिग्दर्शन चक रुसेलने केलं आहे. विनीत जैन यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या प्रीती शहानी सहनिर्मात्या आहेत. हा सिनेमा ५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकाना माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्री पाहायला मिळेल.


प्राण्यांच्या डॅाक्टरांच्या भूमिकेत

या सिनेमात विद्युत एका प्राण्यांच्या डॅाक्टरांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात मकरंद देशपांडे आणि अतुल कुलकर्णी या दोन मराठमोळ्या कलाकारांचाही समावेश आहे. सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन रोहन सिप्पी करणार होता. या सिनेमाची संकल्पना १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाथी मेरे साथी' या सिनेमावरून प्रेरीत असल्याचं त्यावेळी रोहन म्हणाला होता, पण नंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमेरिकन दिग्दर्शक चक रुसेल यांच्याकडे सोपवण्यात आली. चक यांनी यापूर्वी 'द मास्क', 'इरेझर' आणि 'द स्कॅार्पियन किंग' हे यशस्वी सिनेमे बनवले आहेत.



हेही वाचा - 

हा आहे भन्साळींचा नवा चेहरा!

ऋतिकच्या खांद्यावरील गमछाचं रहस्य काय?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा