Advertisement

ऐश्वर्याचा ट्वीटरवर शेअर केलेला फोटो विवेक ओबेरॉयला भोवला

विवेक ओबेरॉयनं ट्विटरवर शेअर केलेल्या सटायर फोटोवरून महिला आयोगानं त्याला नोटीस बजावली आहे. शिवाय नेटकरांच्या रोषाचा देखील त्याला सामना करावा लागत आहे.

ऐश्वर्याचा ट्वीटरवर शेअर केलेला फोटो विवेक ओबेरॉयला भोवला
SHARES

अभिनेता विवेक ओबेरॉयला ट्विटरवर एक फोटो ट्वीट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर त्यानं शेअर केलेल्या सटायर फोटोवरून त्याला महिला आयोगानं नोटीस बजावली आहे. शिवाय नेटकरांच्या रोषाचा देखील त्याला सामना करावा लागत आहे.


काय होतं फोटोत?

विवेकनं शेअर केलेल्या फोटोत सलमान खान, ऐश्वर्या राय-बच्चन, तो स्वतः आणि अभिषेक बच्चन आणि आराध्या दिसत आहे. सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो सगळ्यात वर आहे. त्याला ओपिनियन पोल म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर एग्झिट पोल म्हणून स्वतः विवेक आणि ऐश्वर्याचा फोटो आहे तर रिझल्ट म्हणून अभिषेक- ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे.


नेटकरांची नाराजी

सोशल मीडियावर हा फोटो रांचीच्या पवन सिंह नावाच्या व्यक्तीनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. विवेकनं त्याला रिट्वीट केलं आणि सोबत लिहिलं 'काय क्रिएटिव्हीटी आहे. यात कोणतंही पॉलिटीक्स नाहीये. हीच लाईफ आहे.' पण विवेकनं रिट्विट करताच अनेकांनी त्याच्यावर टीका केली. अनेकजण म्हणाले विवेकनं हे फक्त पब्लिसिटीसाठी केलं आहे. यातून स्पष्टपणे दिसतं की, त्याच्या मनात महिलांविषयी किती सन्मान आहे. अनेकांनी आपली मत व्यक्त करत विवेकवर नाराजी व्यक्त केली.


महिला आयोगाची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील विवेकच्या या रिट्वीटचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याच्या या कृत्याची तक्रार राष्ट्रवादीनं महिला आयोगाकडे केली. महिला आयोगानं विवेकला नोटीस पाठवली आहे. 


सोनमनं फटकारलं

विवेकनं शेअर केलेल्या फोटोवरून बॉलिवूडमधून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री सोनम कपूर विवेकवर चांगलीच संतापली आहे. 

"विवेक तू शेअर केलेला फोटो अत्यंत दर्जाहीन आणि तिरस्कार निर्माण करणारा आहे. हे योग्य नाही”, असं म्हणत सोनमनं विवेकला फटकारलं आहे.



हेही वाचा

काळवीट शिकार प्रकरण : सैफ अली खानसह तीन अभिनेत्रींना नोटीस

भारतीय नौदलावर आधारित 'नेव्ही डे'



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा