Advertisement

काळवीट शिकार प्रकरण : सैफ अली खानसह तीन अभिनेत्रींना नोटीस

मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडून सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. राजस्थान सरकारनं मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात याचिका केल्यानंतर न्या. मनोज गर्ग यांच्या एक सदस्यीय खंडपीठाकडून ही नोटीस बजावण्यात आली.

काळवीट शिकार प्रकरण : सैफ अली खानसह तीन अभिनेत्रींना नोटीस
SHARES

अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काळवीट शिकार प्रकरणी या चौघांना नव्यानं नोटीस बजावण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठानं ही नोटीस बजावली आहे.


८ आठवड्यांनंतर सुनावणी

गेल्यावर्षी ५ एप्रिल रोजी मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडून सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. राजस्थान सरकारनं मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात याचिका केल्यानंतर न्या. मनोज गर्ग यांच्या एक सदस्यीय खंडपीठाकडून ही नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस दुष्यंत सिंग यालाही बजावण्यात आली आहे. काळवीट शिकार झाली तेव्हा दुष्यंत सिंग सोबत होता असा आरोप आहे. ८ आठवड्यांनंतर याप्रकरणी सुनावणी करण्यात येणार आहे.


सलमानला शिक्षा

सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांच्यावर सलमान खानला शिकारीसाठी प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ रोजी १ आणि २ ऑक्टोबरच्या रात्री काळवीटाची शिकार करण्यात आली होती. एप्रिल २०१८ मध्ये मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडून सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर इतर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.



हेही वाचा -

करण ओबेराॅयचा जामिन अर्ज फेटाळला

'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटात अक्षय कुमार साकारणार ट्रान्सजेंडरची भूमिका




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा