करण ओबेराॅयचा जामिन अर्ज फेटाळला

बलात्काराच्या आरोपाखाली सध्या पोलिस कोठडीत असलेला अभिनेता करण ओबेराॅयने दाखल केलेला जामिन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

SHARE

बलात्काराच्या आरोपाखाली सध्या पोलिस कोठडीत असलेला अभिनेता करण ओबेराॅयने दाखल केलेला जामिन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

एका ज्योतिषी महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर कथित बलात्कार केल्याप्रकरणी करण ओबेराॅय सध्या पोलिस कोठडीत आहे. पीडित महिला आणि करण २०१६ पासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी करणने तिच्यावर बलात्कार करून त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि व्हिडिओ दाखवून तिला सातत्याने ब्लॅकमेलही केलं, असा आरोप महिलेने करणवर लावला आहे. 

पोलिसांनी करण ओबेराॅयला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर करणने माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहे, असं म्हणत जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाच्या सुनावणी दरम्यान करणच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, करणवरील सर्व आरोप आधारहीन आहेत. करण आणि तक्रारदार महिला यांच्यातील संबंध परस्पर सहमतीने झाले होते. करण आणि तक्रारदार महिलेने एकमेकांना केलेल्या मेसेजमधून ही बाब सिद्ध होते. 

यावर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत करणचा जामिन अर्ज फेटाळला. 

 


हेही वाचा-

करण ओबेराॅयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुरुषांसाठी 'MenToo' चळवळ सुरू करायची गरज: पूजा बेदीसंबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ