Advertisement

लग्नानंतर अनुष्का लागली तयारीला


लग्नानंतर अनुष्का लागली तयारीला
SHARES

विरुष्काच्या लग्नाला दीड महिना उलटला आहे. तोच विराट तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तर इकडे अनुष्का शिलाई काम करताना दिसत आहे. दचकलात ना. पण खरंतर ती हे सर्व तिच्या आगामी सिनेमासाठी करत आहे. अनुष्का सध्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त झाली आहे.

नुकताच अनुष्काने या चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती शिलाई काम करताना दिसत आहे. या फोटोला अनुष्काने छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘कतरन से बुनी कहानी पैबंद लगा के है सुनानी’



या चित्रपटात अनुष्का आणि वरूण धवन हे प्रमुख भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे अनुष्का आणि वरूण एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. यात अनुष्काची नेमकी काय भूमिका आहे? हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या चित्रपटात वरूण टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहेत. तर मनिष शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'मेड इन इंडिया'च्या आयडिओलॉजीवर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाशिवाय अनुष्का होम प्रॉडक्शनच्या 'परि' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमा असून फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. त्याचबरोबर अनुष्का आनंद एल. रॉय यांच्या 'झिरो' या चित्रपटात शाहरूख आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा