Advertisement

देशात १० महिन्यात १० हजार कंपन्यांना टाळं

लॉकडाऊनचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. लॉकडाऊनच्या काळात देशातील अनेक कंपन्यांना टाळे लागले. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले.

देशात १० महिन्यात १० हजार कंपन्यांना टाळं
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता.   लॉकडाऊनचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. लॉकडाऊनच्या काळात देशातील अनेक कंपन्यांना टाळे लागले. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले. 

कंपनी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील १० हजार ११३ कंपन्या बंद झाल्या. या कंपन्या स्वइच्छेने बंद झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहेत.

दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच २३९४ कंपन्या बंद पडल्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये १९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू (१३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या बंद पडल्या आहेत. 

झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १०४ कंपन्यांना एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये टाळे लागले. मेघालयमध्ये ८८, ओदिशामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्चिम बंगालमध्ये ४, तर अंदमान निकोबारमध्ये २ कंपन्या बंद झाल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०२०च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. लाॅकडाऊन हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठं कारण आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा