Advertisement

लाॅकडाऊनमध्ये भारतात वाढले ४० अब्जाधीश, अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' वाढ

२०२० वर्ष कोरोनाचा काळ म्हणून संपूर्ण जगासाठीही वाईट ठरलं. मात्र, हे वर्ष काहींना खूप खास ठरलं आहे. या काळात देशातील भांडवलदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

लाॅकडाऊनमध्ये भारतात वाढले ४० अब्जाधीश, अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' वाढ
SHARES

कोरोना लाॅकडाऊनमुळे देशभरात सर्वांनाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. २०२० वर्ष कोरोनाचा काळ म्हणून संपूर्ण जगासाठीही वाईट ठरलं. मात्र, हे वर्ष काहींना खूप खास ठरलं आहे. या काळात देशातील भांडवलदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. भारतात तब्बल ४० अब्जाधीश वाढले आहेत. बातमी समोर आली आहे. 

हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ ने जगातील श्रीमंतांची ताजी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार, कोरोना काळात भारतात ४० अब्जाधिशांची वाढ झाली आहे. भारतातील एकूण अब्जाधिशांची संख्या आता १७७ वर पोहचली आहे. जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेले  रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २०२० मध्ये २४ टक्के वाढ झाली आहे.

जगातील श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानींचा आठवा क्रमांक लागतं आहे. अंबानीकडे ६.१ लाख कोटी रुपये (८३ बिलियन डॉलर) ची संपत्ती आहे. या यादील अंबानी मागील वर्षी ९ व्या स्थानी होते. ऍलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

 गुजरातमधील व्यापारी गौतम अडानी यांच्या संपत्तीत २०२० मध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती २.३४ लाख कोटी (३२ बिलियन डॉलर) झाली आहे. ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ४५ व्या स्थानी आले आहेत. आयटी कंपनी एचसीएलचे शिव नडार १.९८ लाख कोटी (२७ बिलियन डॉलर) संपत्तीसह भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

 

भारतातील १० श्रीमंत व्यक्ती 

१. मुकेश अंबानी 

२. गौतम अडानी 

३. शिव नादर 

४. लक्ष्मी मित्तल 

५. सायरस पुनावाला 

६. हिंदुजा ब्रदर्स 

७. उदय कोटक 

८. राधाकिशन दमानी 

९. जय चौधरी 

१०. दिलीप संघवी

जगातील ५ श्रीमंत उद्योगपतींची संपत्ती

एलन मस्क    १४.४६  लाख कोटी रुपये

जेफ बेजोस    १३.८८ लाख कोटी रुपये

बर्नार्ड अर्नाल्ट    ८.३७ लाख कोटी रुपये

बिल गेट्स         ८.०७ लाख कोटी रुपये

मार्क जुकरबर्ग    ७.४२ लाख कोटी रुपये

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा