Advertisement

मुंबईत राहतात सर्वाधिक श्रीमंत लोक; दिल्ली दुसऱ्या स्थानावर

भारतातील २३३ शहरांची नावे या यादीत समाविष्ठ अाहेत. मात्र, यामधील जास्तीत जास्त श्रीमंत लोक मुंबईमध्ये राहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक श्रीमंत शहर बनले अाहे. सर्वाधिक श्रीमंत शहरांमध्ये दुसऱ्या स्थानावर दिल्ली अाहे.

मुंबईत राहतात सर्वाधिक श्रीमंत लोक; दिल्ली दुसऱ्या स्थानावर
SHARES

तुम्हाला माहिती अाहे का भारतात सर्वाधिक श्रीमंत लोक कोणत्या शहरात राहतात? तुम्ही अंदाज करू शकता का की दिल्लीमध्ये राहणाऱ्या गर्भश्रीमंतांची संपत्ती किती असेल? नाही ना? तर मग अाम्ही तुम्हाला सांगणार अाहोत भारतातील श्रीमंत लोकांकडे असलेल्या संपत्तीबाबत. बारक्लेज हरुन इंडियाने देशातील श्रीमंत लोकांची यादी तयार केली अाहे.  या यादीनुसार  श्रीमंतांच्या संपत्तीची जी अाकडेवारी समोर अाली अाहे त्याने तुम्ही अाश्चर्यचकित व्हाल. या यादीत अशा श्रीमंतांचा समावेश अाहे ज्यांची संपत्ती तब्बल एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अाहे.


दिल्लीतील गर्भश्रीमंत

बारक्लेज हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत यावर्षी दिल्लीतील १६३ श्रीमंत लोकांचा समावेेश अाहे. अाश्चर्याची बाब म्हणजे या १६३ श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल ६ लाख ७८ हजार ४०० कोटी रुपये अाहे. हे एेकून देशातील अाणि जगातील लोकांचे डोळे विस्फारले असतील.


सर्वाधिक श्रीमंत शहर 

भारतातील २३३ शहरांची नावे या यादीत समाविष्ठ अाहेत. मात्र, यामधील जास्तीत जास्त श्रीमंत लोक मुंबईमध्ये राहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक श्रीमंत शहर बनले अाहे. सर्वाधिक श्रीमंत शहरांमध्ये दुसऱ्या स्थानावर दिल्ली अाहे. तर बंगळुरू या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अाहे. या शहरातील ६९ लोक श्रीमंतांच्या यादीत अाहेत.


कोण टाॅपवर ?

भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले उद्योगपती मुकेश अंबानी हे यादीत पहिल्या स्थानावर अाहेत. १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंत लोकांच्या यादीत ८३१ भारतीय अाहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ३.७१ लाख कोटी रुपये अाहे.

दिल्लीतील श्रीमंत

या यादीतील दिल्लीतील एचसीएलचे शिव नादर यांची संपत्ती ३७ हजार ४०० कोटी रुपये अाहे. तर अायशर मोटर्सचे विक्रम लाल (३७,१०० कोटी), रोशनी नादर (३१,४०० कोटी), भारती एअरटेलचे सुनील मित्तल (२२,५०० कोटी), डीएलएफचे राजीव सिंह (२१,००० कोटी) अादींचा या यादीत समावेश अाहे. 





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा