मुंबई - बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. मुहनोत यांची नोव्हेंबर 2013 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. पुण्यातील बंगल्याच्या नुतनीकरणासाठी मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच बँकेच्या अधिकारातील मुंबईतील एक निवासस्थानही त्यांनी ताब्यात ठेवलं होतं. अर्थमंत्रालयानेही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.