'बीएसएनएल' देणार स्वस्त स्मार्टफोन


SHARE

दूरसंचार क्षेत्रात नुकतीच १७ वर्षे पूर्ण करणारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ग्राहकांना लवकरच 'लो काॅस्ट हॅण्डसेट कम सिम कार्ड' असं स्वस्त स्मार्टफोनचं पॅकेज उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात कंपनी लवकरच मायक्रोमॅक्स आणि लावा या मोबाईल उत्पादक कंपन्यांशी करार करणार असून अंदाजे अडीच हजार किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या रेंजमधील हे फोन्स असतील.

नेमक्या किती रुपयांना स्वस्त फोन उपलब्ध करून देता येईल, हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. कारण किमतीवर आमचे अजून काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया हैद्राबाद टेलिकाॅम डिस्ट्रीक्टचे मुख्य महाव्यवस्थापक के. रामचंद यांनी दिली.

'बीएसएनएल'चे सध्या देशभरात २ जी आणि ३ जी नेटवर्क सुरू असले, तरी सरकारी मालकीची ही कंपनी लवकरच ४ जी सेवा सुरू करणार आहे. येत्या काळात 'बीएसएनएल' ५ जी साठीही प्रयत्नशील राहणार आहे.
रिलायन्स जियोने जुलैत सेवा सुरू केल्यापासून खासगी क्षेत्रातील सर्वच कंपन्या सध्या ग्राहक टिकवण्यासाठी नवनवे प्लान्स आखत आहेत. त्यातुलनेत सरकारी कंपन्या बऱ्याच मागे आहेत.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय